माजी उपमहापौरांची अशीही चमकोगिरी

Foto

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा व्हिडिओ केला व्हायरल !

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रूग्णाची ओळख गुपित ठेवण्याचे सरकारचे आदेश आहेत. सदर रुग्णाची मनस्थिती लक्षात घेता त्यांचे फोटो, घर याबाबतची माहिती गुप्त ठेवली जाते. मात्र माजी उपमहापौर विजय औताडे यांनी चमकोगिरीच्या नादात रुग्णाच्या घराचा आणि रुग्णाचा व्हिडिओ व्हायरल करून नाहक मनस्ताप केला आहे. 
शहरात सध्या कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर बनली आहे. दररोज नवनवीन वसाहतीमध्ये रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे प्रशासन चांगलेच हैराण झाले आहे. अशा परिस्थितीत खरेतर लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे काटेकोर पालन करायला हवे. मात्र आपल्या परिसरात रूग्ण सापडला की राजकीय नेते मंडळी नगरसेवक या परिसरात धावतात. धूर फवारणी यासह लाऊडस्पीकर वर आवाहन करीत असल्याचे व्हिडिओ, फोटो शेअर करतात. यात अनेकदा गफलतही होते. 

माजी उपमहापौरांची चमकोगिरी !

दरम्यान काल हर्सूल परिसरातील म्हसोबा नगर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. माजी उपमहापौर विजय औताडे यांच्या वाड्यात आणि त्यांच्या कार्यालयाच्या नजीकच असलेल्या रुग्णांना दाखल करताना स्वतः औताडे हजर होते. रुग्णाच्या घराचे फोटो त्याला रुग्ण रुग्णवाहिकेत बसवितानाचा व्हिडीओ त्यांच्या समर्थकांनी तयार केला. हा व्हिडीओ तातडीने माध्यमावर व्हायरल करण्यात आला. अशा प्रकारे चमकोगिरीच्या नादात माजी उपमहापौरांनी नियमांचे उल्लंघन केले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker